#coronavirus : रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी ठाकरे सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये 

मुंबई – अत्यवस्थ करोना बाधितांवर उपचारांसाठी प्रभावी ठरणाऱ्या “रेमडिसिविर’ या इंजेक्‍शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. औषध मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागत आहे. रेमडिसिविरचा काळाबाजार होत असून, दुकानदारांकडून साठेबाजी होत असल्याचा आरोपही केला जात आहे. यावर आता ठाकरे सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून  “रेमडिसिविर’ या इंजेक्‍शनचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. 

याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की,’ कोकण, पुणे व नागपूर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त,न.प. व नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्यासोबत व्हिसीद्वारे पार पडलेल्या आढावा बैठकीदरम्यान रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्या, रुग्णवाढीचा दर ५% पेक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न करा,असे निर्देश दिले.

ऑक्‍सिजनवरील रुग्णांनाच “रेमडिसिविर’
“रेमडिसिविर’बाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश काढले आहेत. या औषधाची उत्पादन क्षमता आणि मागणी यामध्ये तफावत असल्याने त्याचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. गरजू रुग्णांना वेळेत औषधे मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. बाधितांवर कसे उपचार करावेत याबाबत केंद्र सरकाराचे नियम आहेत. त्यानुसार रेमडिसिविर हे इंजेक्‍शन “मॉडरेट कंडिशन’ (ऑन ऑक्‍सिजन) असलेल्या रुग्णांनाच देण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे या सूचनेनुसारच उपचार करण्यात यावेत, असे या आदेशात नमूद केले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.