#coronavirus : विनाकारण मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांना शेखर सुमनने झापले

आजकाल जो कोणी उठतो तो करोनाबाबतची माहिती फॉरवर्ड करत असतो. त्यामुळे माहितीमध्ये भर घालण्याच्या नादात एखादेवेळी चुकीची माहितीही दिली जाऊ शकते. अशा विनाकारण फॉरवर्ड करणाऱ्यांना शेखर सुमनने चांगलेच झापले आहे.

अशी माहिती फॉरवर्ड करण्यापेक्षा आपल्या डॉक्‍टरांची भेट घ्यावी. त्यांचाच सल्ला घ्यावा, असे शेखर सुमनने म्हटले आहे. आपण घरच्या घरी डॉक्‍टर-डॉक्‍टर खेळता कामा नये. व्हॉटस्‌ ऍपवर मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून राहायला नको.

चांगल्या औषधांच्या नावांची जाहिरात करण्यासाठी औषध कंपन्या आपला स्वार्थही साधत असतात. त्यापासून जरा दूरच राहिले पाहिजे, असेही त्याने म्हटले आहे. करोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी करोनाची लस आवर्जून घ्यावी आणि घराबाहेर पडणे शक्‍यतो टाळावे, असेही त्याने त्याच्या फॅन्सना सुचवले आहे. हे करणे खूप सोपे वाटू शकते.

मात्र, त्याची अंमलबजावणी खूप अवघड आहे. या साथीदरम्यान आपण अंमलबजावणीवर भर द्यायला पाहिजे, असेही तो म्हणाला. याच आठवड्यात आणखी एका ट्‌विटमध्ये शेखर सुमनने इतरांना मदत करण्याचे आवाहनदेखील केले होते.

सोशल मीडियावरच्या मदतीमुळे अजून माणुसकी जिवंत आहे, हे लक्षात येते. या मदतकार्याच्या उदाहरणांमुळे डोळ्यात पाणी येते, असेही त्याने कबूल केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.