जगन्नाथ पुरी व्यतिरिक्त अन्यत्र रथयात्रेला परवानगी नाकारली

नवी दिल्ली – ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी व्यतिरिक्त अन्यत्र रथयात्रा आयोजित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

करोनाच्या साथीमध्ये चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रथयात्रेबाबत कोणताही धोका स्वीकारता येऊ शकणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ओडिशा सरकारने यापूर्वी या रथयात्रांना परवानगी नाकारली होती. मात्र ओडिशा उच्च न्यायालयाने या रथयात्रांना परवानगी दिली होती. न्यायालयाच्या त्या आदेशांला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

आपल्याला स्वतःलाही रथयात्रेला जाण्याची खूप ईच्छा आहे. मात्र सरकारच्या निर्णयामुळे ते शक्‍य नाही. आपल्याला टिव्हीवरच रथयात्रा बघावी लागेल. रथयात्रा आयोजित करण्याची परवानगी दिली जाऊ शकणार नाही, असे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा यांनी सांगितले.
यावर्षी जगन्नाथ पुरी येथील प्रसिद्ध रथयात्रा 12 जुलै रोजी होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.