चीनमधून स्थलांतर सुरू : बळींची संख्या 259

बिजिंग : भारतासह अनेक देशांनी कोरोना विषाणूंची साथ पसरलेल्या चिनच्या वुहान शहरातून आपले नागरिक हलवण्यास सुरवात केली आहे. दरम्यान चिनमधील मृतांची संख्या 259वर पोहोचली असून सुमारे 12 हजार लोकांना बाधा झाली आहे.

या विषाणूची बाधा दोन डझनहून अधिक देशांत झाली आहे. केरळमध्येही एका रुग्णला याची बाधा झाल्याचे निश्‍चित झाले आहे. चीनने शनिवारी प्रसिध्द केलेल्या आकडेवारीत कोरोनाने शुक्रवारी एका दिवसांत 46 बळी घेतल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मृतांची संख्या 259 वर पोहोचली आहे. दोन हजार 1092 जणांना नव्याने बाधा झाली. त्यामुळे बाधीतांची संख्या 11 हजात 988 वर पोहोचली आहे. त्यापैकी एक हजार 795 लोकांची रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आणखी 17 हजार 988 जणांना याची बाधा झाली असण्याची शक्‍यता आहे.

भारतासह अन्य देशांत 124 जणांना या विषाणूंची बाधा झाली आहे. भारतातील पहिला बाधीत केरळमध्ये आढळला असून अमेरिका, द. कोरीया, इंग्लंड आणि बांगलादेशने त्यांचे नागरिक विमान पाठवून हलवण्यास सुरवात केली आहे.

एअर इंडियाच्या जम्बो बोईंग बी 747 विमानातून 324 भारतीयांना शनिवारी सकाळी भारतात आणण्यात आले. त्यात 211 विद्यार्थी आणि 110 कर्मचारी आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. शनिवारी दुपारी अन्य प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी दुसरे विमान पाठवण्यात आले. भारतात आलेल्या विमानात राम मनोहर रुग्णालयातील पाच डॉक्‍टर होते. तसेच पथक दुसऱ्याही विमानत असेच पथक असेल, असे एअर इंडियाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

इंडो तिबेटी सीमा पोलिसांनी दिल्लीतील छावला भागात 600 खाटांचे रुग्णालय युध्द पातळीवर उभारले आहे. त्यात या आजारच्या संशयित रुग्णावर उपचार करण्यात येणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे जागतिक आणीबाणी जाहीर केली आहे. मात्र त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार अथवा प्रवासावर निर्बंध सुचवलेले नाहीत. दरम्यान, हॉंगकॉंग विद्यापीठातील संशोधकांच्या मते वुहानमध्ये 75 हजार 815 जणांना वुहानमध्ये बाधा झाली असू शकते, असे वुहानमधील लोकांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.