राजधानी दिल्लीत करोनाचा हाहाकार; सरकारी शाळांमध्ये उभारली जाताहेत कोविड सेंटर्स

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतही मोठ्या प्रमाणात कोविडचे पेशंट आढळून येत असल्याने आता दिल्लीतील राष्ट्रकुल गेम व्हिलेजमधील स्टेडियम्‌स आणि सरकारी शाळांमध्ये कोविड सेंटर उभारली जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

ते म्हणाले, या ठिकाणी येत्या काही दिवसांत सहा हजार बेड्‌स उपलब्ध होऊ शकणार आहेत. दिल्लीत गेल्या 24 तासांत करोनाचे तब्बल 24 हजार रुग्ण आढळून आले असून, येथील स्थिती भयंकर आहे. रुग्णांना बेड्‌स उपलब्ध नाहीत.

ऑक्‍सिजन, रेमडेसिविर, लस आणि अन्य औषधांचा पुरवठा कमी पडत आहे. केंद्र सरकार राजधानी दिल्लीतच पुरेशी औषधे पुरवत नसेल तर देशभरात नेमकी काय स्थिती असेल याची कल्पना करवत नाही, असे आम आदमी पक्षाच्या अन्य नेत्यांनी म्हटले आहे.

दिल्लीत आता खासगी दुकानांमधूनही ऑक्‍सिजन विकत मिळेनासा झाले आहे. दिल्लीत जी बेड्‌सची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यातील आयसीयूचे केवळ शंभर बेड्‌स आता शिल्लक उरले आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.