#Corona : मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर स्वरा भास्कर भडकली, म्हणाली…

नवी दिल्ली  – कोरोना सारखं महाभयानक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि. 3) सकाळी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तिमिरातून तेजाकडे जाण्याचा सल्ला दिला. म्हणजे, येत्या 5 एप्रिलला रात्री 9 वाजता त्यांनी घरातील लाईट बंद करून आपल्या घराबाहेर किंवा बाल्कनीत दिवा किंवा मोबाईल टॉर्च पेटवण्यास सांगितंलं. मोदींच्या या उपक्रमानंतर आता त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठत आहे.

अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री ‘स्वरा भास्कर’ हिने मोदींवर ट्विटच्या माध्यमातून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

स्वरा भास्करने म्हटलं की, “थाळी वाजवा, टाळी वाजवा, दिवे लावा, टॉर्च लावा…सर्व करा पण हे लक्षात ठेवा की हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्स व मेडिकल कर्मचारी आहेत ज्यांना या प्रदर्शनापेक्षा जास्त ग्लोव्हज, मास्क यांसारख्या त्यांच्या सुरक्षेची सामग्री हवी आहे त्यांचा जीव वाचवण्यासाठी जेणेकरून ते कोरोना व्हायरसपासून देशाला वाचवू शकतील”.

 

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.