मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील ३९ वर्षीय व्यावसायिक व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डाॕ.मंजुषा सातपुते -इसवे यांनी दिली आहे.
या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, मांडवगण फराटा येथील माजी सरपंचाना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. याच कुटुंबातील व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सदर व्यक्तीने स्वतःचे स्वॕब तपासणीसाठी पाठविले होते. त्यात सदर व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
सदर व्यक्ती तब्बल ९ जणांच्या संपर्कात आला असून सर्वांना क्वारटाईन करण्यात आले आहे. सदर व्यक्ती हा व्यावसायिक असून अनेक जणांच्या संपर्कात येण्याची शक्यता असल्याने संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी पुढे येत प्रशासनाला माहीती द्यावी व स्वतः क्वारटाईन व्हावे असे आवाहन डॉ.मंजुषा सातपुते-इसवे यांनी केले आहे.
आजपर्यंत मांडवगण फराटा येथे करोनाचे 10 रुग्ण सापडले असून शिरूरच्या पुर्व भागातील 6 गावात आतापर्यंत करोनाने शिरकाव केला आहे. शिरुरच्या पुर्व भागात एकूण 23 करोना रुग्ण सापडले असून त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.तर त्यापैकी 4 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत तर 18 जण उपचार घेत आहेत.