वाघोली (प्रतिनिधी) : केसनंद (ता. हवेली) येथील पाटील वस्ती परिसरामध्ये असणाऱ्या एका सोसायटीतील २८ वर्षीय गर्भवती महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे.
सदरच्या महिलेची प्रसूतीची तारीख जवळ आली असल्याने पुणे शहर परिसरातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ये-जा होत होती. महिलेला उपचारासाठी बावधन येथे दाखल करण्यात आले आहे.
महिलेच्या सोसायटी परिसरामध्ये केसनंद ग्रामपंचायतीच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. केसनंदमध्ये आत्तापर्यंत दोन कोरोनाचे रुग्ण सापडले असून एक जण बरा होऊन घरी परतला आहे तर एक अॅक्टीव आहे.