Corona Virus Maharashtra : जाणून घ्या राज्यात आज किती नवे करोना पाॅझिटिव्ह, पाहा संपूर्ण आकडेवारी

मुंबई – राज्यात करोनाचा धोका कायम असून गेल्या 24 तासात राज्यात 15 हजार 602 नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर 88 करोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन करोनाबाधितांची संख्या कालच्या तुलनेत केवळ 215 ने कमी आहे. काल ही संख्या 15 हजार 817 इतकी होती.

गेल्या 24 तासात एकूण 7 हजार 467 करोनाबाधित रूग्णांना उपचारानंतर डिस्टार्ज देण्यात आला आहे. काल 11 हजार 344 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

दरम्यान, राज्यातील करोनाबाधित सक्रिय रूग्णांची 1 लाख 18 हजार 525 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.3 टक्के इतका आहे. तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.49 टक्के आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.