चार वर्षापूर्वी भारत सरकारने नोटबंदी केली होती. यामुळे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन असे वाटले होते.पण काही काळ डिजिटल पेमेंटचा वापर वाढला मात्र, जेव्हा देशात चलन पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले तेव्हा रोख रकमेचा वापर सुरू झाला. यामुळे पुन्हा डिजिटल पेमेंट करण्यात घट झाली आणि सरकारच्या डिजिटल पेमेंट करण्याच्या मोहिमेला फारश यश आलं नाही. मात्र, करोनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी रोख व्यवहारऐवजी डिजिटल पेमेंट करण्यास पंसती दिल्याने जून 2020 मध्ये डिजिटल पेमेंटच्या आकडेवाडीत वाढ झाल्याचे समोर आले आहे.कोरोनाच्या काळात नागरिकांनी वीज बील पासून किराणामालाच्या बीलांसाठी डिजिटल पेमेंटचा वापर केला आहे.
यूपीआयचा वापर झाला अधिक….
नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन आॅफ इंडियाच्या माहिती अहवालानुसार जूनमध्ये नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने लाॅकडाऊनमध्ये यूपीआय चा वापर सर्वाधिक केला. यूपीआयच्या सहाय्याने या काळात 1.2 ट्रिलियन ट्रान्झॅक्शन केलं आहेत.
जीडीपीमध्ये दहा टक्के डिजिटल ट्रान्झॅक्शनचा हिस्सा….
देशाच्या जीडीपीमध्ये 10 टक्के हिस्सा हा डिजिटल ट्रान्झॅक्शनचा आहे. त्याबरोबरच सरकारने डिजिटल ट्रान्झॅक्शन प्रतिदिन एक बिलियन पोहचविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कोरोनाचा धोका पाहता लोक डिजिटल पेमेंटला प्राधान्य देत असून याआधीच्या तुलनेत डिजिटल व्यवहारात दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या वर्षी आरबीआयने (रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होत की, 2021 पर्यंत डिजिटल पेमेंटला जीडीपीच्या 15 टक्क्यांपर्यत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे.