बापरे…! करोनातून बरे झाल्यानंतर उद्भवतायेत लैंगिक समस्या; जाणून घ्या तज्ज्ञांचा दावा

नवी दिल्ली  – करोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत घातक ठरत आहे. विषाणूचा हा नवा अवतार  फुफ्फुसांना थेट संसर्ग करतो. त्यामुळे करोना झाल्याचे उशिरा लक्षात येते. करोना सातत्याने आपले रूप बदलत आहे आणि नवीन रूपामध्ये फुफ्फुसांना पुरेशी हानी झाल्यानंतर लक्षणे दिसू आले आहे.

धक्कादायक संशोधन! कोरोनातून बरे झाल्यानंतरही होऊ शकतो मृत्यू; ‘या’ प्रकारच्या रुग्णांना सर्वाधिक धोका

या लाटेतील रुग्णांमध्ये कोरोनातून बरे झाल्यानंतरही लक्षणे दीर्घकाळ राहू शकतात असे संशोधकांनी म्हटले आहे. कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना नंतर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

यातच नवीन संशोधनामधून धक्कदायक खुलासा करण्यात आला आहे , करोनामधून  बरे झाल्यानंतरही कोरोना व्हायरस पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जाऊन करोनाची कारखाना तयार करत आहे. यामुळे पुरुषांना ताठरता Erectile dysfunction समस्या होत आहे.

याबाबत रोम यूनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी १०० पुरूषांच्या फर्टिलिटीची टेस्ट करून संशोधन केले. यातील १०० पैकी २८ पुरुषांना ताठरतेची समस्या दिसून आली. केस स्टडीतील डॉक्टर १०० लोकांसोबत बोलले. यातील २८ पुरूषांना इरेक्टाइल डिस्फंशनची समस्या येत होती.

सामान्य पुरूषांच्या तुलनेत कोरोना संक्रमित पुरूषांमध्ये इरेक्टाइल डिस्फंशनची समस्या तीन पटीने जास्त आहे.  कोरोना व्हायरस पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टच्या आतील इरेक्टाइल कोशिकांवर ताबा मिळवतो. याने पुरूषांच्या लैंगिक क्षमतेवर वाईट प्रभाव पडत आहे. असे या संशोधनातून पुढे आले.  

पुरूषांबाबत कोरोना व्हारसच्या होणाऱ्या परिणामांबाबत हा नवा रिसर्च आहे. ही बाब तर प्रमाणित झाली आहे की, कोरोना व्हायरसचा वाईट प्रभाव महिलांच्या तुलनेत पुरूषांवर जास्त पडत आहे. पुरूष अधिक वेगळ्या आजारांनी ग्रस्त होत आहेत. दरम्यान, कोरोनातून बरे झालेल्या पुरूषांच्या लैंगिक क्षमतेवर वाईट प्रभाव पडत आहे.

नवीन  लक्षणांची यादी पुढीलप्रमाणे :
1) डोकेदुखी
सातत्याने डोकेदुखी हे करोनाचे नवे लक्षण आहे. जर औषधाचा एक डोस घेऊन बर वाटत नसेल तर ही वेळ आहे डॉक्‍टरांच्या सल्ला घेण्याची.
2) डोळे लाल होणे
डोळे लाल होणे हे करोनाचे नवे लक्षण आहे. अनेकदा यासोबत डोळे सुजल्याचे आढळून आले आहे.
3) अंग दुखी
करोनाचे नवे लक्षण अंगदुखी हे आहे. औषध घेऊनही बरे वाटत नाही विशेषतः सांधे दुखत राहतात.
4) अतिसार
नेहमीपेक्षा जर पोट साफ करायला जास्तवेळा जावे लागत असेल तर तेही करोनाचे लक्षण आहे. यावेळी करोनाबाधितांच्या अतिसाराच्या तक्रारी आहेत.
5) अशक्तपणा
करोनाच्या दुसऱ्या लाटेत सामान्य लक्षणे दिसत आहेत अशक्तपणा हेही लक्षात आहे.अशाक्तपनाने डोळ्यापुढे अंधारी येत असेल तर काळजी घेणे आणि तपासणी घेणे चांगले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.