श्रीनगर : कोरोना विषामुळे एका दहा वर्षाच्या मुलाचा श्रीनगरमध्ये मृत्यू झाला आहे. एका धर्मगुरूंच्या संपर्कात आल्याने या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र जागा नसल्याने त्या मुलाची चाचणी होऊ शकली नव्हती.
त्याला रुग्णालय प्रशासनाने घरीच राहण्याचा सल्ला दिला होता. रुग्णालयाच्या निष्काळजीमुळे या मुलाला आपले प्राण मुकावे लागले आहे.
नंतर त्याला शेर-ए काश्मीर इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सच्या रुग्णलयात दाखल करण्यात आलं. मंगळवारी त्याचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान त्याने एका धर्मगुरुसोबत हस्तांदोलन केलं होतं. त्या धर्मगुरुला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यालाही कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून आले. मात्र तो रुग्णालयात चाचणी करण्यासाठी गेला असता त्याला रुग्णालयाने त्याला घरीच राहण्याचा सल्ला दिला.
रुग्णालयाच्या निष्कजीपणामुळे त्याला नाहक आपले प्राण गमवावे लागले आहे.