नवी दिल्ली- देशात करोना संकटादरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून सक्रिय रुग्णांच्या संख्येत सुद्दा कमालीची घट झाली आहे. सोमवारी (7 फेब्रुवारी) आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 83 हजार 876 नवीन रुग्ण आढळले आहेत. जे कालच्या तुलनेत सुमारे 25 हजारांनी कमी आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासात 895 लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आता 11 लाख 8 हजार 938 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 99 हजार 54 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. दैनंदिन संसर्ग दर 7.25 टक्क्यांवर आला आहे, ही देखील दिलासादायक बाब आहे.