नवी दिल्ली – देशात सलग दुसऱ्या दिवशी 3 हजारांहून अधिक करोना रुग्ण आढळले आहेत. या संसर्गामध्ये पाच रुग्णांचा मृत्यूही झाल्याची माहिती आहे. त्यामुळे देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 208 झाली आहे. गुरुवारी 3016 रुग्ण आढळले. तर गेल्या 24 तासांत ही संख्या 3,095 होती. गेल्या 6 महिन्यांतील एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे.
2020 मध्ये देशात कोरोनाची पहिली लाट आल्यापासून एकूण मृत्यूंची संख्या 5 लाख 30 हजार 862 वर गेली आहे. बुधवारी महाराष्ट्रात 3, दिल्लीत 2, हिमाचलमध्ये 1 आणि केरळमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दैनिक सकारात्मकता दर 2.73% नोंदविला गेला आहे, तर साप्ताहिक सकारात्मकता दर 1.71% इतका आहे.
दिल्लीत गेल्या 1 आठवड्यात रुग्णांत 3 पट वाढ झाली आहे. आठवडाभरापूर्वी येथे दररोज सुमारे 100 प्रकरणे येत होती. 29 मार्च रोजी 300 रुग्णांना लागण झाल्याचे आढळून आले, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. देशात सलग दुसऱ्या दिवशी 3 हजारांहून अधिक करोना रुग्ण आढळले आहेत. या संसर्गामुळे पाच रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
दरम्यान, बुधवारी देशातील एकूण नवीन रुग्णांपैकी केरळ, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशमध्ये 70% रुग्ण आढळले. केरळमध्ये 686, महाराष्ट्रात 483, गुजरातमध्ये 401, दिल्लीत 300 आणि हिमाचलमध्ये 255 नवीन बाधित आढळले आहेत. महाराष्ट्रात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत 2, तर हिमाचल प्रदेशात 1 जणाचा मृत्यू झाला. बुधवारी केरळ आणि गुजरातमध्ये एकही मृत्यू झाला नाही.