जामखेड : जामखेड तालुक्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंतादायक झाली असून आज केलेल्या 75 जणांच्या रॅपिड अँटिजेन तपासणीत 13 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 62 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जामखेड तालुक्यात कोरोना बाधिताची रूग्णांची संख्या 200 च्या घरात गेली असून नागरिकांकडून कोरोना बाबतीत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालय अंतर्गत आरोळे हाॅस्पिटल येथे रॅपिड अँटिजेन तपासणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शहरासह ग्रामीण भागात रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
आज झालेल्या 75 जणांच्या तपासणीत 13 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये खर्डा येथे 8 रत्नापूर 1, झिक्री 1, जामखेड शहरातील शिवाजी नगर येथे 2, बीड रोड येथे 1 असे एकुण 13 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.