CoronaVaccine : योगी सरकारही सरसकट मोफत लसीकरण करणार

अलाहाबाद, – केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करोना पॉझिटिव्ह आढळले असून ते सध्या विलगीकरणात आहेत.

उत्तर प्रदेशात वीकेण्ड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाउन असेल. तसेच नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर गोष्टींना परवानगी नसणार आहे.

यासंदर्भात योगी आदित्यनाथ यांनी ट्‌विट करत मंत्रिमंडळ बैठकीत उत्तर प्रदेशातील 18 वर्षाच्या पुढील सर्वांना कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना हरेल आणि भारत जिंकेल, असे म्हटले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.