CoronaVaccine : रशियाची स्पुटनिक व्ही लस ‘या’ महिन्यांत उपलब्ध होणार

हैदराबाद  – स्फुटनिक व्ही ही रशियाची करोना विरोधी लस या वर्षी एप्रिल ते जून महिन्यांदरम्यान भारतात उपलब्ध होईल. डॉक्‍टर रेड्डी लॅबोरेटरी कडून ही लस आयात करायला सुरुवात होणार आहे. मात्र एकूण किती डोस खरेदी करायचे तसेच वितरणासाठी शीतगृहांची उपलब्धता यावर एकूण किती लस उपलब्ध होईल हे अवलंबून असेल.

डॉक्‍टर रेड्डीज लॅबोरेटरी कडून “रशियन डायरेक्‍ट इन्वेस्टमेंट फंड’ बरोबर संपर्क साधला गेला आहे. या व्यवहारातून सुमारे 250 दशलक्ष डोस मिळणे अपेक्षित आहे, असे डॉक्‍टर रेड्डीज लॅबोरेटरी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सापरा यांनी सांगितले. ही लस 125 दशलक्ष नागरिकांसाठी पुरेशी असेल. मात्र भारतात आवश्‍यक डोसची संख्या परस्पर सहमतीने निश्‍चित केली जाईल.

लसीच्या किमतीबाबत सरकार बरोबर चर्चा सुरू आहे. या तिमाहीमध्येच रशियातून लस आयात करण्याची प्रक्रिया सुरु होईल. खरेदी व्यवहाराचे अन्य सर्व तपशील पुढील काही आठवड्यात स्पष्ट होतील असे सापरा म्हणाले.

डॉक्‍टर रेड्डी लॅबोरेटरीला आतापर्यंत मर्यादित स्वरूपातील लस उपलब्ध झाली आहे. शीतगृहातील साठवणुकीसाठी हा साठा देखरेखीखाली आहे. शीतगृहांच्या उपलब्धतेसाठी डॉक्‍टर रेड्डी लॅबोरेटरी कडून काही व्यवस्था केली जात आहे. ही व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर स्फुटनिक व्ही प्लस दोन तासात उपलब्ध करून देणे शक्‍य होणार आहे. लसीची उपलब्धता वाढवणे जुलै आणि सप्टेंबर दरम्यान शक्‍य होईल. रशियन डायरेक्‍ट इन्वस्टमेंट फंडने ग्लॅड फार्मा, स्तेलीस बायोफर्मा हीटरो बायोफर्मा पेना किया बायोटेक बायोटेक आणि शिल्पा मेडिकेअर कंपन्यांबरोबर 850 दशलक्ष डोससाठी करार केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.