CoronaUpdates : आता ‘या’ राज्यात करोना रुग्ण सातपटींनी वाढले

श्रीनगर  – जम्मू काश्‍मीर मधील करोना रुग्णांची संख्या महिन्याभरात सात पटींनी वाढली आहे. सध्या श्रीनगर मध्ये सर्वाधिक 2833 रुग्ण असल्याचे अधिकृत माहितीमध्ये म्हटले आहे. जम्मू कश्‍मीर मधील काही जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या घटली होती. हे जिल्हे करोना मुक्त म्हणून घोषित केले गेले होते. मात्र आता करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये या जिल्ह्यांमध्येही रुग्ण सापडू लागले आहेत.

19 मार्चला श्रीनगर जिल्ह्यामध्ये 564 सक्रिय रुग्ण होते ही संख्या आता 2,833 वर पोहोचली आहे. तर जम्मू मधील रुग्णांची संख्या 211 वरून 1,582 इतकी झाली आहे. सध्या जम्मूमध्ये एक लाख 39 हजार 381 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी काश्‍मीर मध्ये 83,679 आणि जम्मू विभागात 55,702 रुग्ण आहेत. संपूर्ण जम्मू-काश्‍मीरमध्ये 2 हजार पेक्षा अधिक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.