CoronaUpdates : करोनावरील प्रभावी ‘नेझल स्प्रे’ची ब्रिटनमधील चाचणी यशस्वी

लंडन  – सॅनोटाईज नेझल स्प्रे चाचणीमध्ये प्रभावी ठरल्याची बातमी आता ब्रिटनमधून आली आहे. सॅनोटाईजच्या वापरानंतर करोनाबाधितांमधील विषाणूंचा प्रभाव 24 तासांमध्ये 95 टक्के आणि 72 तासांमध्ये 99 टक्के कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

ही क्‍लिनिकल चाचणी बायोटेक कंपनी सॅनोटाईज रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि ब्रिटनच्या ऍशफूड अँड पीटर्स हॉस्पिटलने केली आहे. शुक्रवारी या चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले.
सध्या जगभरात विविध देशांमध्ये करोना लसींच्या वापराला मिळालेल्या मान्यतेनंतर लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यातच या स्प्रेच्या चाचणीला मिळालेले यश पाहता, आणखी एक आशेचा किरण दिसू लागला आहे.

दरम्यान, जगभरात केरोना विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी सुरु असणाऱ्या असंख्य प्रयत्नांमध्ये नेझल स्प्रेला मिळालेले हे यश पाहता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठीच्या उपायांमध्ये आणखी एका पर्यायाची जोड मिळाली आहे. भारतामध्ये या स्प्रेच्या वापरासाठी येत्या काळात कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला जातो का, याकडेही साऱ्यांच्याच नजरा असणार आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.