वॉशिंग्टन – जॉन्सन ऍण्ड जॉन्सनच्या लसीचा वापर काही काळासाठी थांबवण्याची सूचना अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने केली आहे. या लसीच्या वापरानंतर अमेरिकेतील सहा जणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे समोर आले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
जॉन्सन ऍण्ड जॉन्सनसह फायजर आणि मॉडर्नाची लस अमेरिकेतील लसीकरणात वापरण्यात येते. अमेरिकेत आतापर्यंत 6.8 दशलक्ष जणांना जॉन्सन ऍण्ड जॉन्सनची लस देण्यात आली आहे. त्यापैकी सहाजणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे समोर आले असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटले आहे. या लसीचा एकच डोस घ्यावा लागतो. तर, इतर लशींचे दोन डोस घ्यावे लागतात.
रक्ताची गाठ झाल्याची तक्रार करणाऱ्या सहाही महिला असून त्या 18 ते 48 वयोगटातील आहेत. करोना लसीचा डोस घेतल्यानंतर सहा ते दिवसानंतर लक्षणे आढळून आली. डॉक्टरांनी रक्ताच्या गाठींवर हेपरिनने उपचार सुरू केले. पण, हे प्रकरण गंभीर असू शकते आणि वेगळ्या उपचारांची शिफारस आरोग्य नियामकांनी केली.