CoronaUpdates : “मुंबईत सेलिब्रिटींनी हॉस्पिटलमधील बेड अडवून ठेवले”

मुंबई  – मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढत असताना बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनी सौम्य लक्षणे असतानाही मुंबईतल्या हॉस्पिटल मधील बेड अडवून ठेवले आहेत, असे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे. हे बेड गंभीर आजारी रुग्णांच्या उपचारांसाठी वापरले जायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

फिल्म इंडस्ट्री आणि क्रिकेट विश्वातील काही सेलिब्रिटींना करोना संसर्गाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. मात्र तरीही ते मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत आणि दीर्घकाळापासून त्यांनी तेथील बेड अडवून ठेवले आहेत, असे शेख यांनी पत्रकारांना सांगितले विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने केलेली करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तो काही दिवस मुंबईतील रुग्णालयात दाखलही झाला होता. नुकतेच त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आले आणि घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर शेख यांनी केलेली टिप्पणी सूचक आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मुंबईत सरासरी दहा हजार रुग्ण दर दिवशी सापडत आहेत. मुंबईत सध्या करोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या 90 हजारांपेक्षा अधिक आहे. करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येऊ लागला आहे आणि हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्‍सीजन आणि औषधे अपुरी पडू लागली आहेत. आगामी दोन महिन्यात तीन मोठी हॉस्पिटल उभारली जातील असे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.