लखनऊ – उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापाठोपाठ उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचा करोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
अखिलेश यादव यांनी खुद्द ट्विट करून आपला करोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचं म्हटलं आहे. ट्विटमध्ये अखिलेश म्हणाले की, माझी करोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. मी स्वत:ला क्वारंटाईन केलं असून घरीच माझ्यावर उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी करोना चाचणी करून घ्यावी. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आयसोलेट व्हावं, अस आवाहनही अखिलेश यादव यांनी केलं आहे.
अभी-अभी मेरी कोरोना टेस्ट की रिपोर्ट पॉज़िटिव आई है। मैंने अपने आपको सबसे अलग कर लिया है व घर पर ही उपचार शुरू हो गया है।
पिछले कुछ दिनों में जो लोग मेरे संपर्क में आये हैं, उन सबसे विनम्र आग्रह है कि वो भी जाँच करा लें। उन सभी से कुछ दिनों तक आइसोलेशन में रहने की विनती भी है।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 14, 2021
यापूर्वी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करोनाची लागण झाली आहे. ते सध्या विलगीकरणात असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात योगी आदित्यनाथ यांनी देखील ट्विट करून माहिती दिली होती.