CoronaUpdates : सर्वोच्च न्यायालयाने जारी केल्या अतिरिक्‍त प्रतिबंधक सूचना

नवी दिल्ली  – सर्वोच्च न्यायालयात येणाऱ्या व्यक्तींसाठी न्यायालयाने आज अतिरिक्त प्रतिबंधक सूचना जारी केल्या. करोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात कार्यरत 44 कर्मचाऱ्यांमध्ये करोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर न्यायालय प्रशासनाकडून या सूचना दिल्या गेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात 3 हजार कर्मचारी कार्यरत आहेत.

या नवीन सूचना अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात येणारे रजिस्ट्री स्टाफ आणि अन्य कर्मचारी, ऍडव्होकेट आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना जर कोविड-19 संसर्गाची लक्षणे असतील तर त्यांनी रॅपिड अँटीजेन किंवा आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य असेल. सर्व कर्मचाऱ्यांनी मास्क घालने, सामाजिक अंतर पाळणे आणि सॅनिटायझर ने वारंवार हात धुणे आवश्‍यक असेल. ताप, खोकला, अंगदुखी, चव आणि वास न समजणे, उलट्या आदी लक्षणे दिसत असल्यास अशा कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात येऊ नये. त्यांनी त्वरित स्वतःला विलगीकरणात ठेवावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.