CoronaUpdates : देशात दर मिनिटाला 117 नवे रुग्ण, तर तासाला ‘एवढे’ मृत्यू

मुंबई – देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या दररोज दीड लाखांहून अधिक रुग्ण वाढत असून आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण आला आहे. त्याचवेळी आरोग्य सुविधेअभावी मृत्यूदर वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मागील 24 तासांत देशात 1 लाख 68 हजार नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर विक्रमी 904 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा वेग ताशी पाहिल्यास देशात तासागणिक 7038 नवे कोरोना रुग्ण समोर येत आहेत. यात दर मिनिटाला 117 नवे करोना रुग्ण आढळून येत आहे. तर, प्रत्येक मिनिटाला 38 जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहे.

गेल्यावर्षी अमेरिकेत जशी स्थिती निर्माण झाली होती, तशी स्थिती भारतात होण्यास सुरुवात झाली आहे. करोनाची दुसरी लाट अत्यंत भीषण असून पहिल्या लाटेपेक्षा भंयकर आहे. पहिल्या लाटेत सप्टेबरमध्ये एका दिवसांत सर्वाधिक ९७ हजार ८९४ रुग्ण सापडले होते.  त्यावेळी रुग्णवाढीचा ताशी वेग ४,०७९ रुग्ण एवढा होता.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.