सातारा : जिल्ह्यात करोनाबळी रोखण्यात प्रशासनाला अपयश

कोल्हापूर जिल्ह्यात करोनाबळी पूर्णपणे रोखण्यात यश तर, सातारा जिल्ह्यात करोना मृत्यू का?

सातारा(प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल (शनिवार, दि. 28) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 135 नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे, तर गेल्या 24 तासांमध्ये तीन बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी रविवारी दिली.

या आकडेवारीनुसार, बाधितांचे प्रमाण व करोनाबळींची संख्या कालच्या तुलनेत कमी झाली असली तरी करोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश येत आहे, हे वास्तव आहे. शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबळी पूर्णपणे रोखण्यात यश आले असताना, सातारा जिल्ह्यात बळी का जात आहेत, हा चर्चेचा विषय आहे. दरम्यान, जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 51 हजार 59 तर करोनाबळींची संख्या 1713 झाली आहे.

जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना वाठार बुद्रुक, ता. खंडाळा येथील 55 वर्षीय महिला, उंब्रज, ता. कराड येथील 85 वर्षीय महिला, बिदाल. ता. माण येथील 73 वर्षीय पुरुष, अशा तीन बाधितांचा मृत्यू झाला.

सातारा तालुक्‍यामध्ये सातारा शहरात शाहूनगर, गोडोली प्रत्येकी दोन, गुरुवार पेठ, सदरबझार प्रत्येकी एक, इतरत्र चार, बोरखळ चार, लिंब तीन, जरेवाडी, बोरगाव, खामगाव, वनवासवाडी, पोगरवाडी, नेले-किडगाव प्रत्येकी एक, कराड तालुक्‍यामध्ये कराड शहर चार, कार्वे, कोरेगाव, मलकापूर प्रत्येकी दोन, शामगाव, विंग, कोळवाडी, येळगाव, सैदापूर, आटके, हेळगाव, वडोली, ओंड प्रत्येकी एक, पाटण तालुक्‍यात बेलवडे खुर्द एक,

फलटण तालुक्‍यामध्ये फलटण शहरात गोळीबार मैदान दोन, मलठण एक, इतरत्र सहा, साखरवाडी सात, तारगाव, मुरुम, गुणवरे, सुरवडी प्रत्येकी दोन, सांगवी, कोळकी, ढवळेवाडी, पिंपळवाडी, फडतरवाडी, तिरकवाडी, हिंगणगाव, विडणी, खराडेवाडी प्रत्येकी एक, खटाव तालुक्‍यात खटाव 12, फडतरवाडी, ललगुण प्रत्येकी एक,

माण तालुक्‍यात म्हसवड पाच, धनगरवाडी, दहिवडी, कुळकजाई, मार्डी, पानवण, गोंदवले,जाशी प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्‍यात कोरेगाव दोन, सुर्ली, एकसळ प्रत्येकी एक, जावळी तालुक्‍यात सायगाव एक,

महाबळेश्वर तालुक्‍यात पाचगणी एक, वाई तालुक्‍यात ओझर्डे सहा, कडेगाव तीन, वाई शहर दोन, खंडाळा तालुक्‍यात लोणंद तीन, शिरवळ दोन, मिरजे एक, इतर नऊ, बाहेरील जिल्ह्यांमध्ये सांगली एक, असे एकूण 135 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.