मुंबई : महाराष्ट्रात करोनाचं थैमान थांबण्याचं नाव घेत नाही. राज्यातील करोना रग्णांची वाढ कायम असून अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. करोना लागण आता कलाकार, सेलिब्रिटींना होत आहे. आता मराठी मालिकांतील कलाकारही करोनाच्या निशाण्यावर आले आहेत. पुरेशी काळजी घेऊनही ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना करोनाची लागण झाली0 आहे.
जोशी यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे. Insta story च्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांनाही काळजी घ्या, असं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
मोहन जोशी हे सध्या अग्गबाई सूनबाई या झी मराठी वरील लोकप्रिय मालिकेत काम करत आहेत. त्यात ते आजोबांची भूमिका साकारत आहेत. मालिकेचं शूटींग हे गोव्यात सुरू होतं. आता गोवा सरकारनेही चित्रिकरणावर बंदी घातली. त्यामुळे गोव्यात सुरू असणाऱ्या मालिकांच शूटिंग पुन्हा ठप्प झालं आहे.