CoronaUpdate : गडकरींच्या प्रयत्नांमुळं नागपूरला मिळणार १० हजार ‘रेमडेसिविर’ इंजेक्‍शन

नागपूर – नागपूरमधील करोना स्थिती हाताबाहेर गेल्याच्या नेतृत्व जर खमके असेल तर काय होऊ शकतं याची चुणुक नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखवून दिली. रेमडेसिविर इंजेक्‍शनचा संपूर्ण राज्यात आणि देशातही तुटवडा भासत असताना गडकरी यांच्या प्रयत्नांनी नागपुरकरांना या इंजेक्‍शनचा साठा उपलब्ध होणार आहे.

रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येथे सध्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडतो आहे. तसेच औषधांचाही तुटवडा निर्माण होतो आहे. त्यामुळे गडकरी यांनी रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या रेमेडेसिविर इंजेक्‍शन उपलब्ध करण्यासाठी हालचाली केल्या आहेत.

त्यांनी थेट सन फार्मा कंपनीच्या मालकाशी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर नागपुरात लवकरच एकूण 10 हजार रेमेडिसिविरची इंजेक्‍शन्स उपलब्ध होणार आहे. नागपूरला आजच पाच हजार तर उर्वरीत पाच हजार इंजेक्‍शन पुढच्या दोन दिवसांत दिली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आल्याचा दावा वाहिनीने केला आहे.

दरम्यान, नागपुरात टेस्ट करण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळी केंद्र उघडली आहेत. त्या ठिकाणी आरटीपीसीआर आणि अँटिजन टेस्ट केली जाते. जवळपास 200 केंद्रांवर ही टेस्ट होते. सोबतच खाजगी रुग्णालय ज्यांना कोविड रुग्णालय जाहीर केले आहे, तिथे काही खाजगी लॅबमध्ये सुद्धा टेस्ट केली जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.