पुणे : शहरात करोना विषाणूचे दोन रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आणि मंगळवारी सकाळपासूनच खळबळ उडाली. यानंतर शहरातील प्रमुख 10 रूग्णालयातही करोना बधितांसाठी उपचाराची सोय करण्यात आली आहे. या रुग्णालयात 41 बेड उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तर सणस स्पोर्ट हॉस्टेल मध्ये 200 बेड तर लायगुडे हॉस्पीटल मध्ये 100 बेड आणि वायसीएम हॉस्पीटल मध्ये 100 बेडची सुविधा उपलबध करण्यात आले असून आवश्यक डॉक्टर व इतर कर्मचारी वर्गही सज्ज ठेवण्यात आला आहे.