नवी दिल्ली : कोविड-19 संदर्भातल्या चाचण्या मान्यताप्राप्त खाजगी प्रयोगशाळांमध्ये करायला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी परवानगी दिली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
देशभरात कोविड-19 या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, संशयित रुग्णांच्या नमून्यांची तपासणी करण्याची क्षमता वाढावी यासाठी ही परवानगी दिली असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
या निर्णयानुसार देशभरातल्या सुमारे 60 मान्यताप्राप्त खाजगी प्रयोगशाळांना चाचण्या करायची परवानगी दिली जाईल. मात्र अजुनपर्यंत या प्रयोगशाळांची नावे निश्चित केली नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
सध्या सरकारकडे चाचण्यांसाठी 60 हजार उपकरणे असून अजून अतिरिक्त 2 लाख उपकरणे मागवली असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हटले आहे.