रांजणगाव गणपती -येथील औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनी कामगाराचा करोना विषाणूच्या आजाराने मृत्यू झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण 60 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती कारेगावचे ग्रामविकास अधिकारी एस. बी. भाकरे यांनी दिली. हा कामगार हा 52 वर्ष वयाचा असून तो हडपसर येथून ये-जा करत होता.
18 मे ते 21 मे या कालावधीत तो कंपनीत कामाला येत होता. आजारी पडल्यावर तो कामगार कामाला यायचा बंद झाला. 25 मे रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कामगाराचे घशाचे स्वॅब घेतले असता करोना पॉझिटिव्ह आले.