भिगवण येथील महिलेचा दुर्दैवी मृत्यु
भिगवण : आज सकाळी भिगवण परिसरातील करोना संक्रमित महिलेचा मृत्य झाला आहे. यामुळे कोव्हिड १९ साथीमुळे पुणे ग्रामीण मध्ये मृत्यूंची संख्या तीन झाली आहे. ग्रामीण भागात संक्रमण रोखण्याचे आव्हान आता प्रसाशनासमोर उभे आहे. इंदापूर तालुक्यातील पहिला मृत्यू तर पुणे ग्रामीण भागतील तीसरा बळी ठरला आहे. इंदापूर तालुक्यात पोलीस आणि आरोग्य प्रशासनाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही करोनाने संक्रमण होते आहे.
त्याचा आज पहिल्याच संक्रमित रुग्णाचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. मंगळवारी २८ एप्रिल रोजी भिगवण परिसरातील एका महिलेस संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले होते. सदरील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २४ जणांपैकी १८ जणांचे चाचणीचे अहवाल प्राप्त आले आहेत. या अहवालातून त्यांना कोरोनाचे संक्रमण न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदरील रुग्णाच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. सदर रुग्णास संक्रमण कोठून झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रसाशनाला सक्रीय रहावे लागणार आहे. तसेच नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.