नवी दिल्ली – देशभरात कोविडच्या रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट नोंदवली गेली असली तरी मृतांच्या संख्येत मात्र फारशी घट होताना दिसत नाही. गेल्या 24 तासांत देशात कोविडमुळे 4205 रुग्ण मरण पावले तर 3 लाख 48 हजार 421 लोकांना नव्याने कोविडची लागण झाली.
त्यामुळे देशभरातील कोविडग्रस्तांची एकूण संख्या आता 2 कोटी 33 लाख 40 हजार 938 इतकी झाली आहे. तथापी सुदैवाचा भाग असा की सक्रिय बाधितांची संख्याही आता घटत आहे. गेल्या 24 तासांतील सक्रिय बाधितांची संख्या 37 लाख 4 हजार 99 इतकी झाली आहे. लागण झालेल्या रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण 15.87 टक्के इतके आहे. कोविडचा राष्ट्रीय रिकव्हरी रेटही काहीं प्रमाणात वाढला असून तो आता 83.04 टक्के इतका झाला आहे. आत्तापर्यंत 1 कोटी 93 लाख 82 हजार 642 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.