जगभरात कोरोनाचा थैमान सुरूच ; 24 तासात 6 लाखाहून अधिक बाधितांची नोंद

न्युयॉर्क : जगात झपाट्याने हात-पाय पसरणाऱ्या कोरोनाने आता 9 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 9 कोटी 11 हजाराहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत जगात कोरोना-संसर्ग झालेल्या रुग्णांची रेकॉर्ड ब्रेकिंग नोंद झाली आहे. यासह कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी चिंताजनक आहे.

दरम्यान वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत जगभरात 6.79 लाखाहून अधिक लोकांना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच, 11 हजाराहून अधिक जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले. आता जगभरात कोरोना संक्रमणाची संख्या 9 कोटींच्या पलीकडे गेली आहे.

कोरोना विषाणूमुळे 19 लाख 33 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 6 कोटी 44 लाख 24 हजारांहून अधिक लोक या आजारातून बरे झाले आहेत. एकूण 9 कोटी पैकी दोन कोटी 36 लाख 53 हजार लोक अजूनही कोरोनाबाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

17 डिसेंबरला सर्वाधिक 7.38 लाख प्रकरणे आणि 16 डिसेंबरला 13,783 लोकांचा मृत्यू झाला होता. कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये दिसून आला आहे. गेल्या काही दिवसात जगातील सर्वात सामर्थ्यवान अशा अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यानंतर जर्मनी, ब्राझील, रशिया, इटली, मेक्‍सिको, ब्रिटन आणि भारतामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.