अर्थसंकल्पीय अधिवेशनाला करोनाची उपस्थिती; ४२ जणांना झाली लागण

मुंबई –  राज्यात आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तत्पूर्वी अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ४२ जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पोलीस आणि पत्रकरांचा समावेश आहे. तर एकही आमदार करोना पॉझिटिव्ह नसल्याचे समजत आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्यांची करोना चाचणी करणे बंधनकारक आहे. यानुसार ३ हजार पेक्षा जास्त जणांची करोना टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये २३ पोलीस कर्मचारी आणि २ पत्रकरांसह अन्य जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पण काही आमदारांनी आणि मंत्र्यांनी खाजगी लॅब मधून टेस्ट केल्या आहेत. त्यांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाही, अशी माहिती विधान भवनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, यंदा दहा दिवस होणार आहे. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल. यंदाच्या अधिवेशनात अशासकीय ठराव तसंच लक्षवेधी होणार नाही.

वर्ष 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळायला लागले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अधिवेशन गुंडाळण्यात आले होतं. एक वर्षांनी पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करावा लागला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.