लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.पंतप्रधान कार्यालयाकडून कडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉ. सांगितले कि, पंतप्रधानांची प्रकृती गंभीर असून त्यांना विलीगीकरण कक्षात ठेवले आहे.
२७ मार्चला बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली होती. त्यात त्यांनी लिहले होते कि, माझे कोरोनाचे नमुने पॉझिटिव्ह आले असून मी स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवले आहे.
पुढे त्यांनी लिहताना ते म्हणतात, यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ५१ हजार ६८० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, ५ हजार ३७३ जणांचा कोरोनामुळे ब्रिटनमध्ये बळी गेला आहे.