पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचे हातपाय पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 48 तासांत ग्रामीण भागात 13 बाधित रुग्ण सापडले आहेत. करोनाचे जे रुग्ण सध्या सापडत आहेत ते जवळपास बाहेरगावावरून आले आहे.
यातील काहीजण क्वारंटाइन असलेले असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच बाहेर गावावरून येणाऱ्यांची माहिती न दडवता ती तात्काळ प्रशासनास द्यावी, अन्यथा स्वत:हून क्वारंटाइन व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.