नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता कोरोनाने तामिळनाडूच्या राजभवनात एन्ट्री केली आहे. आज राजभवनात कोरोनाचे ८४ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सुरक्षारक्षकांसह अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
तामिळनाडूच्या राजभवनाकडूनच याविषयी माहिती देण्यात आली आहे. माहितीनुसार,राजभवनात कोरोनाचे ८४ रुग्ण आढळून आले असून यातील कोणताही बाधित हा राज्यपाल किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले नसल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने संपूर्ण राजभवनाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून बाधितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.