नेपाळच्या राजघराण्यातही करोनाचा शिरकाव; महाराज-महाराणींनी कुंभमेळ्याला लावली होती हजेरी

काठमांडू – नेपाळचे पूर्वीश्रमीचे नरेश महाराज ज्ञानेंद्र शाह आणि त्यांची पत्नी महाराणी कोमल शाह यांना करोनाची बाधा झाली आहे. या दोघांनीही हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये उपस्थिती लावली होती. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्याशिवाय हे दोघेही कुंभमेळ्याहून काठमांडू विमानतळावर दाखल झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शेकडोजण उपस्थित होते. प्रशासनाकडून आता या व्यक्तिंचा शोध घेतला जात आहे.

नेपाळमधील वृत्तानुसार, महाराज ज्ञानेंद्र आणि त्यांच्या पत्नीची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर या दोघांनाही वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आले आहे. माजी महाराज ज्ञानेंद्र यांचे वय 73 वर्ष आहे. त्यामुळे वरिष्ठ डॉक्‍टरांचे एक पथक 24 तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.