पालिकेच्या मार्च एन्डला करोनाचा फटका

सुट्टीच्या दिवसाची करभरणा केंद्र केली बंद

पुणे – महापालिकेच्या मार्च एन्डला करोनाच्या प्रसाराचा फटका बसला आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने मागील आठवड्यापासून सुट्टीच्या दिवशीही करभरणा केंद्र सुरू ठेवण्यात येत आहेत. मात्र, या आठवड्यात शनिवार आणि रविवारी कोणीही फिरकले नाही. त्यामुळे ही केंद्र बंद केली.

शहरातील अनेक नागरिक 31 मार्चपूर्वी मिळकतकर भरण्यासाठी पालिकेत गर्दी करतात. त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळावी म्हणून प्रशासनाकडून शनिवार तसेच रविवारी काही करभरणा केंद्र सुरू ठेवली जातात. त्यात दिवसाचे काही तास नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून दिले जाते, दरवर्षी या सेवेला चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे पालिकेने मागील आठवड्यापासून पुन्हा ही सेवा सुरू केली होती. त्याला चांगला प्रतिसादही मिळत होता.

मात्र, शहरात करोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिक घराबाहेर पडण्यास तयार नाहीत. परिणामी पालिकेने सुट्टीच्या दिवशी सुरू केलेली ही करभरणा केंद्र शनिवार आणि रविवार ओस पडली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.