करोनाचा कहर वाढला.! ओतूरकरांना काळजी घेण्याची गरज

जुन्नर -जुन्नर तालुक्‍यात बुधवारी (दि. 2) 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येत वाढ होऊन 15 हजार 462 झाली आहे. तर 14 हजार 77 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 531 रुग्णांचा मृत्यू झाला असून 866 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

दररम्यान, ओतूरची संख्या काही केल्या कमी होत नसल्याने ओतूरकरांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आज नारायणगाव (7), ओतूर (4), पिंपळवंडी (3), बारव, धालेवाडी, हिवरे खुर्द, उंब्रज नं. 1, जुन्नर शहर (प्रत्येकी 2),

खानगाव, राळेगण, करंजाळे, खुबी, तळेरान, हिवरे तर्फे नारायणगाव, तेजेवाडी, भटकळवाडी, शिरोली बुद्रुक, वैष्णवधाम (प्रत्येकी 1) असे 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.