नवी दिल्ली – मागील काही दिवसांत जागतिक पातळीवर करोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे जगभरात चैतन्याचं वातावरण होतं. मात्र आता रशियातून चिंता वाढविणारी बातमी आली असून 24 तासांत येथे 1002 हजार मृत्यू झालं आहे. त्यातच रशियातील नागरिक स्वदेशी स्पुटनिक लस घेण्यास उदासीन दिसत आहे. तर करोनाचे नियमही पाळले जात नाहीत.
रशियात मागील 24 तासांत 33,208 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. सलग तिसरा दिवस आहे जेव्हा करोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. रशियामध्ये करोना अशा वेळी वाढत आहेत जेव्हा तो सगळ्या जगाला स्पुटनिक ही लस पुरवत आहे. आतापर्यंत देशातील केवळ 31 टक्के लोकांचं पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. येथील नागरिक देखील स्वदेशी स्पुटनिक लस घेण्यास उदासिन असून त्यामुळे देखील करोना पुन्हा वाढत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
रशियामध्ये आतापर्यंत 2,22,315 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, हा आकडा संपूर्ण युरोपमध्ये सर्वाधिक आहे. रशियन प्रशासनावर योग्य आकडेवारी सादर न केल्याचा आरोप असताना ही परिस्थिती आहे.