कोरोनाचा कहर! कुठे कर्फ्यू तर कुठे शाळा अनिश्चित काळासाठी बंद; अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध

नवी दिल्ली : कोरोनाचा भारतातील कहर कमी होताना दिसत नाही. दररोज 2 लाखाहून अधिक रुग्ण समोर येत असून कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्याही सतत वाढत आहे. मागील २४ तासांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह बर्‍याच राज्यात रेकॉर्ड ब्रेकिंगच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाशी सामना करण्यासाठी बर्‍याच राज्यात अधिक काटेकोरपणा केला गेला आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी १९ एप्रिल ते ३ मे दरम्यान संपूर्ण राज्यात विविध सार्वजनिक उपक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत सरकारी कार्यालये, बाजारपेठे, मॉल्स आणि कामाची ठिकाणे बंद राहतील, परंतु कारखाना आणि बांधकामांच्या कामांसाठी कामगारांशी संबंधित कामांवर बंदी घातली जाणार नाही. यासह जे लोक कार्ट आणि फेरीवाले लावून जगतात त्यांना उपजीविकेचे स्वातंत्र्य देण्यात येईल. पब्लिक वर्क प्लेस, सर्व आस्थापने, व्यावसायिक आस्थापने आणि बाजारपेठ पंधरवड्यात बंद करावी.

बिहारमध्ये संपूर्ण राज्यात रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यत कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा व महाविद्यालये १५ मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्ह्यांसमवेत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. जिल्हा प्रशासनाला कलम 144 लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने देखील कडक पावले उचलली असून राजधानी दिल्लीसह सात राज्यातील नागरिकांना राज्यात येण्यासाठी कोरोनाची चाचणी नाकारात्मक असणे बंधनकारक असल्याचे आदेश देण्यात आले आहेत. केरळ, गोवा, गुजरात, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांचा यात समावेश आहे.

झारखंड राज्य सरकारनेही रविवारी सर्व शैक्षणिक-प्रशिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले व तातडीने सर्व परीक्षा पुढे ढकलल्या.पुढील आदेश येईपर्यंत हे नियम लागू असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.