दि.28 मेपर्यंतच्या आकडेवारीपर्यंत पुरुषांना सर्वाधिक बाधा
पुणे – शहरात लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये करोना संक्रमणाला पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक बळी पडत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत होते. मात्र, लॉकडाऊन शिथिलते नंतर पुरुषांचा आकडा वाढला आहे.
पुरुष करोना बाधितांचा आकडा 9 हजार 339 आहे; तर 7 हजार 449 महिला बाधित आहेत.
शहरात लॉकडाऊनच्या काळात करोना बाधित महिलांचा आकडा वाढलेला पाहायला मिळाला होता. अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्या पुरुषांमुळे घरातील महिला संक्रमित होत आहेत. महिलांमधील प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना लगेच संक्रमण होत होते. मात्र आता पुरुषांचेच प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.
महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या 28 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार शहरातील एकूण 5851 बाधीत रुग्ण होते. यामध्ये 3195 महिला तर 2645 पुरुष आहेत. पुरुषांच्या तुलनेत हा आकडा 550 ने जास्त होता. पालिकेने 29 जून रोजी जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार पुरुष बाधितांचा आकडा 9 हजार 339 आहे तर 7 हजार 449 महिला बाधित आहेत. त्यामुळे महिलांच्या तुलनेत 1890 अधिक पुरुष बाधित असल्याचे दिसून येत आहे.