नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 186 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 74 हजार 564 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.70 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 303 ने वाढ झाल्याने जिल्ह्यात करोनाचा अलेख वाढत आहे. त्यामुळे उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 394 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 174, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 118 आणि अँटिजेन चाचणीत 11 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 84, अकोले 19, जामखेड 6, कर्जत 2, नगर ग्रामीण 3, नेवासे 1, पारनेर 1, पाथर्डी 9, राहुरी 5, संगमनेर 30, श्रीगोंदा 4, कॅन्टोन्मेंट बोर्ड 10, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 23, अकोले 3, कर्जत 3, कोपरगाव 7, नगर ग्रामीण 8, नेवासे 7, पारनेर 2, पाथर्डी 2, राहाता 15, राहुरी 09, संगमनेर 21, शेवगाव 1, श्रीरामपूर 12 आणि इतर जिल्हा 5, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 11 जण बाधित आढळून आले. नगर ग्रामीण 2 पारनेर 1, राहाता 4, संगमनेर 2, शेवगाव 1, श्रीरामपूर 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 71, अकोले 2, जामखेड 1, कर्जत 1, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 5, नेवासे 1, पारनेर 16, पाथर्डी 7, राहाता 14, राहुरी 5, संगमनेर 48, शेवगाव 2, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 4 आणि इतर जिल्हा 4, अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्णसंख्या:74564
उपचार सुरू असलेले रुग्ण: 1394
मृत्यू:1152
एकूण रुग्णसंख्या:77110