नवी दिल्ली : रुग्णवाढीचा वेग, कोलमडण्याच्या मार्गावर असलेली आरोग्य व्यवस्था, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रडकुंडीला आलेली रुग्णालये आणि रुग्णांचे होत असलेले मृत्यू अशी अवस्था असणाऱ्या दिल्लीत राज्य सरकारने लॉकडाउन एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीत सध्या चौथ्या लाटेने थैमान घातला आहे. कधी नव्हे इतकी रुग्णवाढ दिल्लीत दररोज नोंदवली जात असून, मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. करोनाच्या चौथ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर केजरीवाल सरकारने लॉकडाउन न लावण्याची भूमिका घेतली होती. मात्र, रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यानंतर रुग्णालयावर अतिरिक्त भार पडू लागला. त्यानंतर सरकारने तातडीने लॉकडाउन लागू केला होता.
We had imposed a 6-day lockdown in Delhi. The lockdown is being extended to next Monday till 5 am: Delhi CM Arvind Kejriwal #COVID19 pic.twitter.com/s1eHgZmaHN
— ANI (@ANI) April 25, 2021
मागील एका आठवड्यांपासून दिल्लीत लॉकडाउन लागू केलेला आहे. या काळात दिल्लीत रुग्णसंख्येत कोणतीही घट झालेली नाही. उलट ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दिल्लीतील आरोग्य व्यवस्था हतबल झाली आहेत.
अनेक रुग्णालयात ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू झाले असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने लॉकडाउन एका आठवड्याने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांनी पत्रकार परिषदे घेऊन याची माहिती दिली.