बारामती(प्रतिनिधी) : शहरातील जळोची येथील ५४ वर्षीय रुग्णाचा रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते.
दोन दिवसांपूर्वी जळोची येथील ५० वर्षीय व्यक्तीस धाप लागणे, अशक्तपणा, न्युमोनियाची लक्षणे होती. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना खासगी दवाखान्यात डॉक्टरांकडे तपासणीसाठी दाखल केले. मात्र त्यांची लक्षणे पाहताच डॉक्टरांनी त्यांना रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला.
त्यावरून काल (ता.७) या रुग्णास रुई येथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.