मांडवगण फराटा (वार्ताहर): शिरूर तालुक्यातील नागरगाव येथील ७० वर्षीय करोना संसर्गित महिला रूग्णाचे उपचारादरम्यान दवाखान्यात निधन झाले असल्याची माहिती निमोणे आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डाॕ.इंदिरा डॕनियल यांनी दिली आहे.
या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, नागरगाव येथील ७० वर्षीय महिलेला सर्दी,खोकला,ताप याचा ञास होत असल्याने त्यांना दि.१० जुलै रोजी तळेगाव दाभाडे येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सदर महिलेत करोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यात त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने तळेगाव दाभाडे येथील खाजगी दवाखान्यात गेले १५ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते.
उपचारा दरम्यान त्यांची गेल्या तीन दिवसापासून प्रकृती खालावल्याने त्यांना कोविड अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांच्या टीमने पूर्ण प्रयत्न करूनही आज (दि.२४) रोजी सकाळी त्यांचे निधन झाले, असे डाॕ.डॕनियल यांनी सांगितले आहे.