सोलापूर : करोनामुक्त असलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये आज करोनाबाधित व्यक्तीचा पहिला बळी गेला आहे. याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माहिती दिली.सोलापुरातील पाछा पेठ परिसरातील किराणा दुकान चालकाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ही चाचणी करण्यात आली होती.
10 एप्रिल रोजी पहाटे त्यांना उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचारदरम्यान 11 एप्रिल रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. यानंतर खबदारी म्हणून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच रुग्ण आढळलेला एक किलोमीटर परिसर सील करण्यात आला असून याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी व पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत.