दौंड तालुक्यात करोनाचा पहिला बळी

सत्तर वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दौंड – दौंड शहरातील 70 वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दौंड तालुक्यातील पहिला बळी करोनाने घेतला आहे. या 70 वर्षीय व्यक्तीचा सोमवारी (दि. 25) करोनामुळे मृत्यू झाल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक संग्राम डांगे यांनी सांगितले.

दौंड शहरातील चार व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आले होते. यातील 70 वर्षीय व्यक्तीला 20 मे रोजी करोनाची लागण झाली होती. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून मयत व्यक्तीच्या मुलाला क्वारंटाइन करम्यात आले आहे, असे डॉ. संग्राम डांगे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.