नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालय अर्थात ‘ईडी’च्या दिल्ली मुख्यालयातील पाच कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ईडी मुख्यालयात कार्यरत असलेल्या तीन अधिकारी व दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले होते. यानंतर तातडीने संपूर्ण इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून ही इमारत रविवार पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
3 ED officials, 2 contractual staff test positive for COVID-19 in ED headquarters; building sealed
Read @ANI Story l https://t.co/sqkxFJytnr pic.twitter.com/4wXT4sflwo
— ANI Digital (@ani_digital) June 6, 2020
याबाबतची माहिती एका नामांकित वृत्तसंस्थेने सूत्राच्या हवाल्याने दिली असून ईडी मुख्यालयात याआधी एका कंत्राटी कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर मुख्यालयात काम करणाऱ्या १५ कर्मचाऱ्यांची खासजी प्रयोगशाळेत कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता याबाबतचे अहवाल प्राप्त झाले असून कार्यालयातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.
विशेष म्हणजे बाधितांपैकी कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळून आली नसून ते इतर कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातही आले नव्हते. बाधा झालेल्यांपैकी कोणीही अंमलबजावणी संचालनालय प्रमुखांच्या संपर्कात आले नाहीत अशी माहिती देखील सूत्राद्वारे प्राप्त झाली आहे.